लाचखोर ढेरिंगेच्या घरी एसीबीची धाड, इकडे नरहरी झिरवळांच्या हालचालींना वेग

 

मंत्रालयातील अन्न व औषध प्रशासनाच्या कार्यालयात लाच घेताना एका लिपिकाला लाचलुचपत प्रतिबंधक खात्याने रंगेहाथ पकडले होते. या प्रकारामुळे राजकीय वर्तुळात मोठी खळबळ उडाली होती. मंत्रालयातील आपल्या कार्यालयातील कर्मचारी लाच घेताना सापडल्यामुळे अन्न व औषध प्रशासन खात्याचे मंत्री नरहरी झिरवळ (Narhari Zirwal) अडचणीत आले होते. याप्रकरणात विरोधकांकडून त्यांच्या राजीनाम्याची मागणी केली जात असतानाच कारवाईलाही वेग आला आहे.

  • या सगळ्या प्रकरणी लाच घेणारा कर्मचारी राजेंद्र ढेरिंगे याला सोमवारी न्यायालयात हजर केले जाणार आहे. तत्पूर्वी एसीबीने राजेंद्र ढेरिंगे याच्या नाशिक रोड येथील घराची झडती घेतली. या घरातून एसीबीच्या हाती काही महत्त्वाची कागदपत्रे हाती लागली आहेत. त्यामुळे आता या प्रकरणात आता आणखी नवीन माहिती समोर येणार का, याकडे सगळ्यांच्या नजरा लागल्या आहेत. 

राजेंद्र ढेरिंगे हा मूळचा अन्न व नागरी पुरवठा विभागातील कर्मचारी आहे. वर्षभरापूर्वी अन्न व औषध प्रशासन विभाग येथे तो प्रतिनियुक्तीवर आला होता. तो मंत्र्यांच्या अपील विभागात कार्यरत असल्याची माहिती आहे. दरम्यान, आता राजेंद्र ढेरिंगेच्या घरातून एसीबीच्या हाती जी कागदपत्रे लागली आहेत त्यामुळे चौकशीला आणखी वेग येण्याची शक्यता आहे. आज ही कागदपत्रं न्यायालयासमोर सादर केली जाऊ शकतात. तेव्हा एसीबीचे अधिकारी एखादी स्फोटक माहिती न्यायालयात सांगणार का, हे बघावे लागणार. राजेंद्र ढेरिंगे याच्या लाचखोरीचे धागेदोरे कुठपर्यंत पोहोचणार, हे पाहणे महत्त्वाचे ठरेल.

Post a Comment

أحدث أقدم
BREAKING NEWS : Loading...

ताज़ा खबरें

राजनीति समाचार
राजनीति समाचार लोड हो रहे हैं...